Pm awas yojana 2024प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादी जाहीर.


Pm awas yojana 2024 :आपल्या देशात नवीन नवीन योजना राबवण्यात येतात त्या पैकी एक म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना त्या मध्ये देशाच्या गोर गरिबांना घर बांधण्यास आर्थिक मदत केली जाते . 

 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सूची सर्वाना स्वतःच्या मालकीचं हक्कच घर मिळवून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे .म्हणून या योजना गावागावात राबवण्यात येतात .

पीएम आवास योजनेच पूर्वी नाव इंदीरा गांधी आवास योजना असं असून त्या योजनेला इ .सन १९८५ ला सुरु करण्यात आले होते,त्या नंतर ते नाव बदलून २०१५ ला प्रधानमंत्री आवास योजना असे नाव देण्यात आले ,या योजनेला PMGAY म्हणजेच Pradhan Mantri Gramin Awas Yojana या नावाने हि ओळखतात .
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवेदन करणे आवश्यक आहे.काही दिवसांनी सूची जाहीर होईल त्या सूचित ज्या लाभार्थी च नाव असेल त्या लाभार्थ्यांना पीएम आवास योजनेचा लाभ मिळतो .

Pm awas yojana 2024

प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे काय ?

आपल्या देशात नवीन नवीन योजना राबवण्यात येतात त्या पैकी एक म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना त्या मध्ये देशाच्या ,गोर गरिबांना घर बांधण्यास आर्थिक मदत केली जाते आणि ,ज्या खूप काही गोर गरिब अजूनही मातीच्या घरात आणि झोपडपट्टया मध्ये राहतात त्या गरिबांना घर बांधणे शक्य नाही तर त्या साठी  हि योजना राबिवण्यात येत आहे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बेघर कुटुंबाना घर बांधण्यासाठी १,३०,००० दिले जातील.
प्रधानमंत्री आवास योजना तर्फे दरवर्षी नवीन लिस्ट प्रसिद्ध केले जाते ज्या युवांनी पहिले नाव व त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांचे नाव त्या लिस्ट मध्ये पाहल्या मिळते तर ते लिस्ट तुम्ही चेक करू शकता


प्रधानमंत्री आवास योजनेची उद्दिष्टे काय ?

  • मिळालेल्या माहितीच्या नुसार प्रधानमंत्री आवास योजनांच्या मार्फत अगदी कमी दारात व्याज दर २० वर्षा पर्यंत मिळतो
  • तुम्ही जे लोन घेता त्या लोनवर मात्र ६.५०% व्याजदर द्यावा लागतो
  • मैदानी क्षेत्रात निवासी असणाऱ्या लाभारती नागरिकांना १,२०,००० प्रयाण ची मदत केली जाते तसेच प्रवर्तित क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना १,३०,००० रुपये आर्थिक मदत म्हणीन दिली जाणे
  • या योजनेच्या अंतर्गत जर घरी शौचालयं निर्माण करण्यात आले तर त्यांना १२००० रुपये प्राची अतिरिक्त मदत दिली जाते
  • योजने मार्फत मिळणारे आर्थिक लाभ सरळ तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जाते


पीएम आवास योजनेत किती अनुदान दिले जाईल ?

सरकार द्वारे चालविण्यात येणारी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरी क्षेत्रात किंवा ग्रामीण क्षेत्र निवासी असणाऱ्या लोकांना 120,000 रुपये किंवा
2,50,000 रुपये पर्यंतचे अनुदान मिळते. वेगवेगळ्या क्षेत्रानुसार अनुदानाची वेगवेगळी रक्कम ठेवण्यात आली आहे. तुमची सबसिडी रक्कम थेट बँक हस्तांतरण प्रणालीद्वारे थेट तुमच्या बँक खात्यात पाठवली जाते.


प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता काय ?

  • प्रधानमंत्री आवास योजनेसाठी केवळ भारतातील कायमस्वरूपी रहिवासी अर्ज करू शकतात.
  • योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आधीच कायमस्वरूपी घर नसावे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ₹3,00,000 ते ₹6 लाख दरम्यान असले पाहिजे
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे किमान वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे नाव शिधापत्रिका किंवा बीपीएल यादीत असल्यास उत्तमच होईल
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे त्याचे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

1. आधार कार्ड

2. छायाचित्र

3. लाभार्थीचे जॉब कार्ड

4. बँक पासबुक

5. स्वच्छ भारत मिशन नोंदणी क्रमांक

6. मोबाईल नंबर

पीएम आवास योजना ग्रामीण यादी 2024 पाहण्याची प्रक्रिया  येथे पहा

जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल आणि तुम्ही गावात राहत असाल, तर तुम्ही खालील चरणांचे अनुसरण करून यादी तपासू शकता.

1. सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अधिकृत वेबसाइट https://pmayg.nic.in/ ला भेट द्यावी लागेल.


2. आता तुमच्या समोर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे होम पेज उघडेल.


3. मुख्यपृष्ठाच्या शीर्षस्थानी मेनू बारमध्ये असलेल्या Awassoft पर्यायावर क्लिक करा.


4. आता तुम्हाला त्या मेनूमधील रिपोर्ट पर्यायावर क्लिक करावे लागेल.


5. आता तुम्हाला https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.


6. सामाजिक लेखापरीक्षण अहवाल (H) विभागात उपस्थित असलेल्या पडताळणीसाठी तुम्हाला लाभार्थी तपशीलाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.


7. आता तुमच्या समोर MIS रिपोर्ट पेज उघडेल.

8. आता त्या पेजवर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल आणि योजनेच्या लाभ विभागात प्रधानमंत्री आवास योजना निवडावी लागेल.


9. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.


10. यानंतर तुमच्या गावाची लाभार्थी यादी तुमच्यासमोर उघडेल



निष्कर्ष

या लेखात आपण बघितले कि पीएम आवास योजना कशी काम करते .आणि या योजने मार्फत कोणाला लाभ मिळू शकतो , व अर्ज करताना आवश्यक असणारे कागदपत्रे .

आम्ही या लेख द्वारे सर्व नागरिकांना पीएम आवास योजने बाबत माहित देत आहोत . या माहित वरून नागरिकांना लाभ मिळावा व सर्व गरजू नागरिक या योजनेचा लाभ घ्यावा हेच आमचं ध्येय .

आशा आहे कि तुम्हाला आमचं लेख आवडला असेल , व माहिती आवडली असल्यास हि माहिती अनेक गरजू नागरिकांना पर्यंत पोहोचावा आणि शेयर करा व

 
तसेच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यास मदत करा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.