MIDC Recruitment 2023 ;12 वी पास आणि पदवीधरांना MIDC मध्ये नोकरची उत्तम संधी!महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये तब्बल 802 पदांसाठी भरती सुरु 2023.
महाकरिअरजॉब ऑनलाईन। MIDC Recruitment 2023 ;महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ, उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहायक रचनाकार, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक (श्रेणी-२), वरिष्ठ लेखापाल, विजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोहारी (श्रेणी-२ ), सहायक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक अग्रिशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, वीजतंत्री श्रेणी (ऑटोमोबाईल), चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक. या पदांच्या एकूण 802 जागा भरले जाणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे.
संस्था - MIDC Recruitment 2023 ;महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
पद संख्या - 802 पदे
अर्ज सुरू होण्याची तारीख - 02 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 सप्टेंबर 2023
भरले जाणारे पदे -
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ, उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहायक रचनाकार, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक (श्रेणी-२), वरिष्ठ लेखापाल, विजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोहारी (श्रेणी-२ ), सहायक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक अग्रिशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, वीजतंत्री श्रेणी (ऑटोमोबाईल), चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक.
◾Executive Engineer (Civil),◾Deputy Engineer (Civil),
◾Deputy Engineer (Electrical/Mechanical),
◾Associate Designer,
◾Deputy Designer,
◾Deputy Chief Accounts Officer,
◾Divisional Fire Officer,
◾Assistant Engineer (Civil),
◾Assistant Engineer (Electrical/Mechanical),
◾Assistant Designer ,
◾Assistant Architect,
◾Accounts Officer,
◾Area Manager,
◾Junior Engineer (Architectural),
◾Junior Engineer (Electrical / Mechanical),
◾Stenographer (Higher Grade),
◾Stenographer (Lower Grade),
◾Steno typist,
◾Assistant,
◾Clerk Typist,
◾Senior Accountant,
◾Technical Assistant (Grade -2),
◾Electrician (Grade-2),
◾Pump Operator (Grade-2),
◾Jodari (Grade-2),
◾Assistant Draftsman,
◾Draftsman,
◾Filter Inspector,
◾Surveyor,
◾Divisional Fire Officer,
◾Assistant Forwarding Officer,
◾Junior Communications Officer,
◾Machine operator,
◾Fire Extinguisher,
◾Electrician Grade 2 (Automobile)
मिळणारे वेतन - (पोस्टनिहाय मिळणारे वेतन तपशील या पृष्ठावर खाली दिले आहेत.)
शैक्षणिक पात्रता - (पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रतेचे तपशील या पृष्ठावर खाली दिले आहेत.)
नोकरी करण्याचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र.
निवड प्रक्रिया - संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा, शारीरिक चाचणी आणि/किंवा व्यापार चाचणी.
अर्ज शुल्क - खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु.१,०००/-, मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी – रु.१००/-
वयो-मर्यादा - वर्ग अ व ब साठी- किमान 21 ते कमाल 38 वर्षे, वर्ग क साठी- किमान 18 ते कमाल 38 वर्षे.
MIDC मेगा सरलसेवा भरती 2023 वयोमर्यादा:-असा करा अर्ज - MIDC Recruitment 2023
◾इच्छुक भरतीकरीता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
◾अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
◾तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
◾अर्ज नोंदणी करण्यासाठी, नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ई-मेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीव्दारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि वेब स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ई-मेल आणि एस.एम.एस. देखील पाठविला जाईल जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरु शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” (Save & Next) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा जतन करु शकतो◾उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील / पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र / गुणपत्रिका / ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरु शकते.
◾“तुमचे तपशील सत्यापित करा” (Validate your details) आणि “जतन करा आणि पुढील” (Save & Next बटणावर क्लिक करुन तुमचा अर्ज जतन करा.◾फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन (Preview) टॅबवर क्लिक करा.
◾आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा. (Complete Registration)
◾“पेमेंट (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट” (Submit) बटणावर क्लिक करावे.
◾उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
◾अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स -
अधिक माहिती साठी जाहिरात पहा - PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक- APPLY
अधिकृत वेबसाईट - midcindia.org
अधिक माहितीसाठी पहा - mahacareerjob.com
जॉब आणि शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला join व्हा.
https://chat.whatsapp.com/DKL3NWBR7jqJ4Z7xoeTNcW
Join Us On Telegram - CLICK
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट – अ –
◾वेतनश्रेणी : Rs-२३ : ६७७००-२०८७०० ◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या नियुक्तीने. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामासाठी किमान ३ वर्षांचा अनुभव तसेच पदवीधारकांसाठी ७ वर्षांचा अनुभव.
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.
उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट-अ –
पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.
सहयोगी रचनाकार गट – अ –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्रज्ञ विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (Town Planning) किंवा Industrial Town Planning मधील पदवी / पदवीका.
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना अथवा तत्संबंधीच्या कामाविषयीचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
उप मुख्य लेखा अधिकारी गट – अ –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील (MBA) (Finance) किमान B+ किंवा तत्सम श्रेणी.
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) गट – ब –
◾पात्रता व अर्हता :- स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी.
सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट – ब –
◾पात्रता व अर्हता :- यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी.
सहाय्यक रचनाकार गट- ब –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र/ नगररचना या विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता धारण करणा-या उमेदवारांमधून.
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट – ब –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्र या विषयातील पदवी.
लेखा अधिकारी गट – ब –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
क्षेत्र व्यवस्थापक गट-ब –
◾पात्रता व अर्हता :- कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट – क –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.
कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट – क –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.
लघुलेखक (उच्च श्रेणी) गट – क –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. तसेच इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १२० श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
लघुलेखक (निम्न श्रेणी) गट – क –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. व टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण व मराठी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
लघुटंकलेखक गट – क –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ६० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
सहाय्यक गट – क –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. सेवेत दाखल झाल्यानंतर २ वर्षांच्या आत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
लिपिक टंकलेखक गट – क –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि… वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
MS-CIT परीक्षा उत्तीर्ण.
वरिष्ठ लेखापाल गट- क –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) गट – क –
◾पात्रता व अर्हता :- शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य / अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.
वीजतंत्री (श्रेणी-२) गट- क –
◾पात्रता व अर्हता :- शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे मिता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक.
पंपचालक (श्रेणी-२) गट – क –
◾पात्रता व अर्हता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय वा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारयंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
जोडारी (श्रेणी-२) गट- क –
◾पात्रता व अर्हता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
सहाय्यक आरेखक गट- क –
◾पात्रता व अर्हता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची विज्ञान विषय घेऊन १२ वी परीक्षा किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता तसेच स्थापत्य (अभियांत्रिकी) मधील पदविका किंवा शासकीय अथवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ‘आरेखन’ या विषयाची प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. संगणक प्रणालीतील Auto CAD प्रणालीचा : क्रम पूर्ण. अनुभवास प्राधान्य.
अनुरेखक गट- क –
◾पात्रता व अर्हता :- शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण. संगणकामधील Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.
गाळणी निरिक्षक गट- क –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची (रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह) विज्ञान शाखेतील पदवी.
भूमापक गट – क –
◾पात्रता व अर्हता :- शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण. संगणक प्रणालीचा Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.
विभागीय अग्निशमन अधिकारी गट-अ –
◾पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापिठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथील बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग (बी.ई. फायर) अथवा अॅडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरींग उत्तीर्ण.
सहायक अग्निशमन अधिकारी गट – क –
◾शैक्षणिक अर्हता :- बी.एससी. भौतिक शास्त्र किंवा रसायन शास्त्र विषय घेऊन किमान ५० टक्के मार्कांनी उत्तीर्ण असावा. किंवा बी.एससी. आयटी किमान ५० टक्के मार्क. किंवा बी.ई. सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचा सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवीका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
कनिष्ठ संचार अधिकारी गट -क –
◾पात्रता व अर्हता :- बी. ई. (इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन) किंवा बी.ई.(इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ कम्युनिकेशन किंवा बी. ई. कॉम्प्युटर (कम्युनिकेशन सह) किंवा बी.ई. रेडीओ इंजिनिअरींग किंवा बी.ई. इन्स्ट्युमेंटेशन किंवा एम.एससी. इन्स्ट्युमेंटेशन किंवा. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरींग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
वीजतंत्री – श्रेणी २ (ऑटोमोबाईल) गट- क –
◾पात्रता व अर्हता :- माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. शासनमान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रीशियनचा कोर्स पूर्ण केलेला असावा.
चालक यंत्र चालक गट-क –
◾पात्रता व अर्हता :- माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. वाहन चालक या पदावर ३ वर्षाचा काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक. वैध जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
अग्निशमन विमोचक गट- क –
◾पात्रता व अर्हता :- माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण असणे आवश्यक. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.
एम.एस.सी.आय.टी (MS-CIT) परीक्षा अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक).
Post a Comment