Maharashtra SSC Result 2024;पेपर चेक झाले; मे अखेर दहावी-बारावीचा निकाल आता जाहीर होणार! ....


महाकरिअरजॉब अपडेट:Maharashtra SSC Result 2024 विभागीय  मंडळांनी  इयत्ता  दहावी आणि 

बारावी  परीक्षेच्या  उत्तरपत्रिका  तपासणीचे  काम  जवळपास  पूर्ण केले  आहे. गुणपत्रिका तयारीचे  काम  सुरू  असून,  मे  महिन्याच्या  अखेरीस  दहावी  आणि  बारावीचा  निकाल  जाहीर  करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे . आणि दहावी  परीक्षेदरम्यान   निवडणुकीची  आचारसंहिता  जाहीर  झाली.  त्यामुळे  शिक्षकांना  प्रशिक्षण  आणि प्रत्यक्षात  मतदान  प्रक्रियेत  ड्युटीही  बजावावी  लागली.  मात्र,  अशा  परिस्थितीतही  अधिकारी, शिक्षकांनी मेहनत घेत उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण केले, असे गोसावी म्हणाले. निवडणुकीच्या  कामात  शिक्षक  वर्ग  गुंतलेला  असल्यामुळे  उत्तरपत्रिकांची  तपासणी  पूर्ण  करणे आव्हानात्मक  होते.  मात्र,  निकाल  वेळेत  जाहीर  व्हावा,  यासाठी  आठवड्यातून  दोन वेळा  व्हीसीद्वारे  बैठक  घेत  विभागीय  मंडळाच्या  अधिकाऱ्यांकडून  आढावा घेतला.  विभागीय मंडळातील  अधिकारी  आणि  शिक्षकांनी  वेळेत  काम  पूर्ण  केले  आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.